भंडारा तालुक्यातील करचखेडा येथे शेतशिवारात अवैधरित्या मोहफुल हातभट्टी दारू गाळप अड्डा सुरू असल्याची माहिती कारधा पोलिसांना मिळाली. दि. १४ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी हातभट्टी दारू गाळप अड्ड्यांवर छापा घालून हातभट्टी उधळून लावली. पोलिसांनी करचखेडा येथील आरोपी जयवंता मेश्राम वय ५२ वर्षे यांच्या ताब्यातून ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ३६० किलोग्रॅम सडवा मोहपास असा एकूण ७२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.