भडगाव : कोठली येथे आज दिनांक 30 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कोठली येथे विविध कार्यकारी सोसायटीची चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. नूतन कोठली विविध कार्यकारी सहकारी सोसायटी एकूण 11 संचालकासह सोसायटीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत कोठली येथील सौ.सविता ज्ञानेश्वर पाटील यांची चेअरमन पदी तर सौं. उषाबाई निंबा पाटील यांची पुन्हा व्हाईस चेअरमन पदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी माजी सरपंच संभाजी इरभान पाटील, साहेबराव अर्जुन पाटील, उपस्थित होते.