भंडारा नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) जोरदार तयारी केली आहे. राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोपिकर यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. या रोड शोची सुरुवात दिनांक ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता संतकृपा सभागृह, स्टेशन रोड, भंडारा येथून होणार असून, त्यानंतर हा रोड शो संपूर्ण भंडारा शहरात भ्रमण करणार आहे. या माहितीची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भंडारा जिल्ह