हवेली: चिखली येथे अटक करण्याची भिती दाखवून दहा लाख लुबाडले
Haveli, Pune | Nov 2, 2025 कुलाबा क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचे सांगत एका नागरिकाला अटक करण्याची भिती दाखवत १० लाख रुपये ऑनलाइन पाठविण्यास सांगून फसवणूक केली. ही घटना चिखली परिसरात २३ मार्च २०२५ रोजी घडली. ज्ञानेश्वर पांडुरंग नाझरे (वय ५९, रा. सदभावना हौसिंग सोसायटी, सेक्टर नं. २०, कृष्णानगर, आकुर्डी-चिखली रोड, चिखली) असे फसवणूक झालेल्या नागरिकाचे नाव आहे.