लाखांदूर: किन्हाळा येथे 42 लाखांच्या कामात अंदाजपत्रकाला दिली तिलांजली; कामाची चौकशी करून दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी
लाखांदूर नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रभागात नागरिक दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू होते तर सदर कामे 42 लाख रुपये होते मात्र सदर काम करताना कंत्राट दराने अंदाजपत्रक बाजूला ठेवून मनमर्जीने काम केल्याने सदर काम निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून सदर काम हा 29 नोव्हेंबर रोजी ग्रामस्थांनी बंद पडला तर सदर कामाची चौकशी करून काम दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी संबंधित नगरपंचायत प्रशासनाला केला आहे