धामणगाव रेल्वे: डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक नगरपरिषद प्रांगण येथे पर्यावरण पूरक गणेश उत्सव बक्षीस वितरण समारंभ सोहळा संपन्न
नगरपरिषद धामणगाव रेल्वे दरा आयोजित पूरक गणेश उत्सव बक्षीस वितरण सोहळा आमदार प्रताप अडसड ,तहसीलदार अभय घोरपडे ,मुख्याधिकारी पूनम कळंबे यांच्या उपस्थितीत पार पडला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर गौरव अभियान, लोक कल्याण मेळावा ,प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलधारकांना प्रमाणपत्र वाटप, महिला बचत गट सदस्यांना प्रमाणपत्र वाटप, कृत्रिम तलाव येथे गणपती विसर्जित करणाऱ्या नागरिकांना लकी ड्रॉ काढून विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व नागरिकांना स्वच्छते विषयी शपथ देण्यात आली.