जळगाव जामोद: स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या विरोधात उबाठा शिवसेनेच्या वतीने तहसील चौकात निषेध
स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहरातील तहसील चौकात निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख गजानन वाघ, सह संपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील, जिल्हा उपप्रमुख तुकाराम काळपांडे, तालुका प्रमुख संतोष दांडगे व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.