राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजनांचा खरा लाभ आता प्रत्यक्ष जनतेला मिळत आहे. भाजपामुळेच आता गावागावात विकासाचे नवे पर्व सुरु झाले आहे,असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील चिखली (बू) येथे आज दि ९ नोव्हेंबर ला 3 वाजता अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला.यावेळी आमदार देवराव भोंगळे बोलत होते.