सेनगाव: कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी गोरेगावात कडकडीत बंद
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव या ठिकाणी आज कडकडीत बंद पाळुन निषेध नोंदविण्यात आला असून या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखेडे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे व प्रवीण मते यांच्यावर सेनगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांनी दाखल केलेले गुन्हे खोटे असल्याचा आरोप करण्यात आला. सदरचे गुन्हे खोटे असून तात्काळ मागे घ्यावे गट विकास अधिकारी यांची बदली करावी या सह विविध मागण्यासाठी बंद पाळण्यात आला.