तासगाव: गुहागर विजापूर महामार्गावरील योगेवाडी फाट्याजवळ बस व आयशर टेम्पोची समोरासमोर धडक, आठजण जखमी*
Tasgaon, Sangli | Aug 19, 2025 गणपतीपुळे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या आनंदयात्रेला आज, मंगळवारी सकाळी आठ नंतर भीषण अपघाताचे ग्रहण लागले. तासगाव तालुक्यातील योगेवाडी फाट्याजवळ कंटेनर, एसटी बसचा भीषण अपघात झाला. या धडकेत बसचालकासह नऊ जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.अपघात गुहागर–विजापूर राष्ट्रीय महामार्गावर झाला. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. घटनास्थळी क्षणभरातच भीषण ओरड, धावपळ आणि रक्तबंबाळ दृश्य निर्माण झाले. काही काळ महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झ