रात्रीच्या वेळी शिकारीच्या शोधात जंगलातून भरकटून गावाच्या दिशेने आलेला एक बिबट्या शेत परिसरातील निवासी घरालगत असलेल्या विहिरीत पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना उघड होताच लाखांदूर वन विभागाचे अधिकारी- कर्मचारी यांनी तत्परता दाखवत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जिवंत बाहेर काढून बिबट्याला जीवनदान दिले . ही घटना तालुक्यातील खोलमारा गावात घडली.