जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात बुधवारी ७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे जिल्ह्याच्या विशेषतः ग्रामीण भागातील भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली असून राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली आहे.