भंडारा जिल्ह्यातील बघेडा येथील आरोपी सियाराम वाघमारे वय 51 वर्षे हा दिनांक 25 ऑक्टोबर रोजी अवैधरित्या देशी विदेशी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती तुमसर पोलिसांना मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व तुमसर पोलिसांनी कारवाई करत आरोपी सियाराम वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून देशी व विदेशी दारू तसेच एक मोटरसायकल असा एकूण किंमत 1 लाख 100 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी सदर आरोपीवर पोलीस स्टेशन तुमसर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे...