नागपूर ग्रामीण: हुडकेश्वर परिसरातून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. जमनेश्वरी उर्फ पूजा राजकुमार मार्को असे बेपत्ता तरुणीचे नाव आहे. ती ७ जूनं रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास श्रीकृष्ण नगर, श्रीकृष्ण मंदिर जवळ येथून कोणालाही न सांगता निघून गेली आहे. तिचा अद्यापही शोध लागला नाही याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आला आहे.