जनार्दन भगत शिक्षण प्रसार संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकुर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खारघर येथील रामशेठ ठाकुर पब्लिक स्कूल मध्ये आंतरशालेय विज्ञान, गणित व एआय कुतूहल कार्निवलचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या कार्निवलमध्ये पनवेल तालुक्यातील १४ शाळांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये सादर झालेल्या प्रकल्पांमधून उत्तम ठरलेल्या कलाकृतींना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.