मनपा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. कल्याण मधील शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला. यावेळी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा पक्षप्रवेश ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे