मोहोळ: जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी पूरग्रस्तांना मदत करावी : जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख
Mohol, Solapur | Sep 30, 2025 सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या जीवावर कारखाने चालतात. त्यामुळे सध्या शेतकरी अडचणीत आहेत. त्यांना साखर कारखानदारांनी मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आज मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9:00 च्या सुमारास पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.