औंढा नागनाथ: नांदेड-छत्रपती संभाजी नगर मार्गावर औंढा जिंतूर टी पॉईंट येथे अनुसूचित जमाती आरक्षणासाठी;सकल बंजारा समाजाचा रास्ता रोको
हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा यासह इतर मागणीसाठी सकल बंजारा समाज बांधवांच्या वतीने दिनांक 16 सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी बारा ते दोन वाजे दरम्यान नांदेड ते छत्रपती संभाजी नगर जाणाऱ्या मार्गावर औंढा नागनाथ येथील जिंतूर टी पॉइंट येथे तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करून मागण्याचे निवेदन तहसीलदार गाडे यांना देण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजी नगर नांदेड तसेच हिंगोली कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती