वलनी परिसरात शनिवारी सायंकाळी रेल्वे रुळावर एका ७३ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अब्दुल सलील अब्दुल माझीद असे मृताचे नाव असून, ते मानसिक आजारावर उपचार घेत त्याची माहिती समोर आली आहे.शनिवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ते घरातून बाहेर पडले होते, त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला. रेल्वे गेटमनने याबाबत पोलिसांना माहिती दिली. 'हितज्योती आधार फाउंडेशन'चे अध्यक्ष हितेश बनसोड च्या मदतीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूरला पाठवण्यात आला.