राहुरी–शनिशिंगणापूर रस्त्यावर उंबरे गावानजीक तांबे पेट्रोल पंपासमोर आज सायंकाळी भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्स आणि तीनचाकी रिक्षा यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत रिक्षातील चार प्रवासी जागीच ठार झाले, तर पाचहून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला असून ट्रॅव्हल्स पलटी झाली आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिस व ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून राहुरी पोलीस पुढील तपास करत आहेत.