पारडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी 7 नोव्हेंबरला सायंकाळी 6:30 वाजता दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे पारडी हद्दीत काकाचा त्याच्याच पुतण्याने खून केला होता. मृतकाने आरोपीच्या आईला पळवून नेले होते याचाच रागातून हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी दिली आहे.