महागाव–उमरखेड मार्गावर महागाव पोलिसांनी विशेष मोहीम राबवून नाकाबंदी केली. या कारवाईत भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५ अंतर्गत जवळपास ३० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आज दि.१३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत विना कागदपत्रे, फिटनेस नसलेली वाहने, हेल्मेट व सीटबेल्ट न वापरणे तसेच ओव्हरलोड वाहने पोलिसांना आढळून आली. दरम्यान पोलिसांनी कार्यवाही केली तसेच पेंडीग दंड वसूल केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.