अकोला: अकोल्यात तामीळनाडु टोळी जेरबंद; दिवाळीपूर्वी मोबाईल चोरी करणाऱ्या गॅंगचा पर्दाफाश.
Akola, Akola | Oct 20, 2025 अकोल्यात तामीळनाडु टोळी जेरबंद; दिवाळीपूर्वी मोबाईल चोरी करणाऱ्या गॅंगचा पर्दाफाश अकोला शहरात उघड्या घरातून मोबाईल चोरी करणाऱ्या तामीळनाडु (वेल्लोर) येथील चौघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिवाळीच्या पूर्वसंध्येला जेरबंद केले. आरोपींकडून विविध कंपन्यांचे ८ मोबाईल, किंमत १ लाख ४० हजार ५०० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शहरातील खदान, सिव्हील लाईन व रामदासपेठ परिसरात झालेल्या चोरींचा तपास तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे करून आरोपींना अटक करण्यात आली.