नागपूर ग्रामीण: हनुमान जयंतीनिमित्त कोराडी परिसरातील मंदिरांमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले दर्शन
हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर नागपूर जिल्ह्यातील कोराडी व परिसरातील विविध हनुमान मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या निमित्ताने श्रीक्षेत्र विठ्ठल-रुक्माई हनुमान मंदिर, विद्युत विहार कॉलनीतील अग्रदूत हनुमान मंदिर, कोराडी येथील हनुमान मंदिर तसेच महादुला व पांजरा येथील मंदिरांना भेट देऊन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मारुतीरायाचे दर्शन घेण्यात आले.