अकोला: काॅटन मार्केट चौकातील भुयारी नाल्यात वाहून गेलेल्या इसमाची तीस तासापासून शोध मोहीम थांबवली उद्या पुन्हा करणार सुरू.
Akola, Akola | Sep 28, 2025 अकोल्यात काॅटन मार्केट चौकातील भुयारी नाल्यात वाहून गेलेल्या इसमाची तीस तासापासून शोध मोहीम सुरु, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका कुटुंबावर संकट.. अकोला शहरातील काॅटन मार्केट चौकातील भुयारी गटार नाल्यात २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मुसळधार पावसात वाहून गेलेला इसम अद्याप बेपत्ता आहे. तब्बल ३० तास उलटूनही त्याचा शोध लागलेला नसल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. या घटनेमुळे एका कुटुंबाचा आधार हिरावल्याचे चित्र उभे आहे