नागपूर ग्रामीण: पांजरी टोलनाका जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
ठाणे बेलतरोडी हद्दीतील पांजरी टोलनाक्याजवळ अज्ञात 60 वर्षीय व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. कृतक हा अनोळखी असून तो या परिसरात काही दिवसांपासून फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी हायवे पेट्रोलिंग ऑफिसर श्रीकांत गिल यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.