भद्रावती: वाघेडा येथील पिण्याचे पाणी व समस्या निवारण्यासाठी शिवसेनेचे पंचायत समिती कार्यालयात निवेदन.
तालुक्यातील वाघेडा येथील पाण्याची टाकी अर्धवट असल्यामुळे गावकऱ्यांना दुषीत पाणी प्यावे लागते. याशिवाय गावात योग्य नाल्या व रस्ते नसल्याने गावकऱ्यांना त्रास सहण करावा लागतो.या समस्येमुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या सर्व समस्या त्वरीत मार्गी लावाव्या अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा शिवसेनेतर्फे पंचायत समिती कार्यालयात सादर करण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.