सातारा: नवरात्र उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी पोलिसांचा राजवाडा येथे मॉब ड्रिलचा सराव
Satara, Satara | Sep 19, 2025 येत्या नवरात्र उत्सव काळात शहरातील उत्सवाचे आयोजन सुरळीत पार पाडावे, कायदा व सुव्यवस्था राखावी यासाठी सातारा शहर पोलिसांनी आज शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी राजवाडा परिसरात मॉब ड्रिलचा सराव केला. या सरावानंतर शहरातून संचलन काढून पोलिस दलाने नागरिकांना शिस्तीचा व सुरक्षिततेचा संदेश दिला. नवरात्रात मोठ्या प्रमाणावर भाविक व नागरिकांची गर्दी होत असल्याने संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलिस कर्मचारी सज्ज राहतील. या सरावात दंगल नियंत्रण पथक, वाहतूक शाखा सामील होते.