दिग्रस: नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार गिरीश पारेकर यांच्याकडे
दिग्रस नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पंत यांच्या बदलीनंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपयुक्त अधिकारी समीर भूमकर यांना दिग्रस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी पदभार न स्वीकारल्याने नगर पंचायत रायगावचे मुख्याधिकारी गिरीश पारेकर यांना आज दि. ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान दिग्रस नगर परिषदेचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. या नियुक्तीमुळे दिग्रस नगर परिषदेचे कामकाज सुरळीतपणे सुरू राहण्याची शक्यता आहे.