अहमदपूर: अहमदपूर तालुका कृषी कार्यालयात ढाळेगाव येथील शेतकऱ्याने गळ्यातील रुमालाने पंख्याला फाशी घेत आत्महत्येचा केला प्रयत्न
Ahmadpur, Latur | Sep 22, 2025 ओला दुष्काळ जाहीर करा.. पीक विमा म्हणत कृषी अधिकार्याच्या कार्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्याचा प्रयत्न ओला दुष्काळ जाहीर करा.. पीक विमा द्या याबाबत निवेदन देण्यासाठी ढाळेगाव येथील शेतकरी अहमदपूरच्या तालुका कृषी कार्यालयात गेले होते. यावेळी संतप्त होत सुभाष पडीले या शेतकऱ्याने गळ्यातील रुमालाने फॅनला फाशी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. सोबतच्या शेतकऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. तरी सरकारने शेतकऱ्याचा अंत न पहाता तातडीने मदत करावी अशी मागणी होत आहे.