सातारा: धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात दखल घेतलीनाही तर दिवाळीत मुंबई बंद करण्याचा धनगर समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इशारा
Satara, Satara | Sep 22, 2025 अनुसूचित जातीच्या यादीतील नोंद क्रमांक 36 मधील धनगड या नावाच्या ऐवजी, धनगर असे वाचावे असा शासनाचा आदेश जारी करण्याबाबत वारंवार आंदोलन करून देखील, शासनाकडून याची अद्यापही दखल घेतली नाही, त्यामुळे आज सोमवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता, सकल धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, शासनाने लवकरात लवकर धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवावा अन्यथा दिवाळीत मुंबई बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.