बीड-पिंपळनेर रोडवर आज दुपारी एक गंभीर अपघाताची घटना घडली. एमएच 23 एडी 5199 या क्रमांकाची चारचाकी गाडी अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर तीन पलट्या घेत शेतात जा जाऊन पडली. अपघाताचा मोठा धक्का बसला असला तरी गाडीत प्रवास करणारे सर्वजण सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यात अचानक एक दारुड्या व्यक्ती समोर आल्याने चालकाने त्याला वाचवण्यासाठी गाडी वळवली. मात्र या दरम्यान गाडीवरील ताबा सुटला आणि वाहनाने सलग तीन पलट्या घेतल्या.