राज्य शासनाने सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीनचा हमीभाव 5 हजार 328 रुपये आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट व समुद्रपूर वगळता 6 खरेदी विक्री केंद्रावर व 7 कृषि उत्पन्न बाजार समिती मार्फत 15 नोव्हेंबर पासुन सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु असून शेतकऱ्यांनी संबंधित खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदीसाठी आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.