जळगाव: खानदेश मिल येथून निघालेल्या भव्य वीर यात्रेने शहर दुमदुमले; भव्य वीर यात्रेचे आयोजन
श्री महावीर दिगंबर जैन चैत्रालय ट्रस्टच्या वतीने रविवारी, 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता शहरात भव्य वीर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जैन धर्माचे तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली. यात्रेला जैन समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद लाभला. हजारो जैन बांधव आणि नागरिक या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.