अक्कलकुवा: गुरांसाठी राखून ठेवलेला चारा दुसरे गुरे चारत असल्याने महिलेला मारहाण कंकाळामाळ येथील घटना
कंकाळामाळ येथे एका महिलेने आपल्या गुरांना चारण्यासाठी कंकाळामाळ शहरातील डोंगरावर गेली असता मारग्या वळवी हा तेथे येऊन सांगू लागला की मी राखलेला चारा आहे तू येथे तुझे गुरे ढोरे चालू नको असे सांगून त्याने त्याच्या हातातील लाकडी काठीने महिलेला मारहाण केली म्हणून दि. 26 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजून 48 मिनिटांनी महिलेने मोलगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.