विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेण्याची आज गरज आहे. सर्व सजीवांप्रमाणेच पर्यावरणीय संरचनेत पक्ष्यांचेही महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. बाबाजी घेवडे यांनी बोर व्याघ्र प्रकल्पात आयोजित पक्षी व पर्यावरण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केले.