नागाव येथे सहा जणांना जखमी केल्यानंतर फरार झालेल्या बिबट्याने आज सकाळी आक्षी येथील साखर परिसरात दोन जणांवर हल्ला चढवला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. आनंद कुमार निषाद आणि मुव्वाला लोकनाथ अशी जखमी तरुणांची नावे आहेत. साखर कोळीवाडा परिसरात राहणारे आनंदकुमार पहाटे पावणेसहा वाजता चहा बनवत होते यावेळी बिबट्या त्यांच्या खोलीत शिरला आणि त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यात त्यांना डोक्याला आणि हाताला जखमा झाल्या. तर लोकना