देशाचं संरक्षण उत्पादन क्षेत्र आत्मनिर्भर बनवणे हे आमचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री Rajnath Singh यांनी आज नागपुरात केलं. कोंढाळी मार्गावरील शिवा-सावंगा परिसरातील सोलर इंडस्ट्रीज द्वारा स्थापित मिडीयम कॅलिबर अम्युनिशन फॅसिलिटी येथे संरक्षण मंत्री राजनाथ_सिंह यांच्या उपस्थिती पिनाका गायडेड रॉकेटचं पहिलं उत्पादन पाठवण्यात आलं, त्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे महसूल मंत्री Chandrashekhar Bawankule देखील उपस्थित होते.