माजलगाव: माजलगावच्या छत्रपती संभाजी महाराज चौकात रास्ता रोको केल्याने अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल
माजलगाव चे छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये शेतकऱ्यांच्या ऊस दर वाढीसाठी 3500 रुपये भाव देण्यात यावा या मागणीसाठी अनेक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते यामुळे सार्वजनिक रहदारीला अडथळा केल्याबद्दल अनेक शेतकऱ्यांवर माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.