शिवसेना पक्षाच्या अधिकृत पदावर असतानाही महापालिका निवडणुकीत दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेना शिंदे गट युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कातोरे आणि शहरप्रमुख महेश लोंढे यांचे पदावरून आणि पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे महापालिका निवडणुकीत महायुतीतून बाहेर पडल्यानंतर शिंदेसेनेने सर्वाधिक 54 जागांवर उमेदवार दिले आहेत अशी माहिती पक्षाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी प्रसार माध्यमांना दिली