मोहाडी तालुक्यातील मौजा बेटाळा येथे जुन्या प्लॉटच्या वादातून एका ३८ वर्षीय शेतकऱ्यावर टोकदार शस्त्राने हल्ला करून जखमी केल्याची खळबळजनक घटना १८ डिसेंबर रोजी घडली. फिर्यादी प्रकाश नेरकर यांनी आरोपी शिवशंकर ऊर्फ बालू लक्ष्मण शेंडे, प्रकाश मोतीराम शेंडे, केशव शेंडे आणि मुकुंदा शेंडे (सर्व रा. बेटाळा) यांच्याकडून प्लॉट खरेदी केला होता. या प्लॉटवर आरोपी ट्रॅक्टरच्या साहाय्याने सपाटीकरण करत असताना फिर्यादीने त्यांना मज्जाव केला. याच रागातून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आरोपींनी फिर्यादीला...