दर्यापूर: गायवाडीत राहत्या घरावर विज कोसळली;भींतीला गेले तडे,टिव्ही,फ्रीज,पंखे आदी जळाली; लाखोंचे नुकसान
काल सायंकाळी विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसा दरम्यान दर्यापूर तालुक्यातील गायवाडी येथे काल सायं ७:३० वाजताच्या सुमारास अशोक साखरे यांच्या राहत्या घरावर विज कोसळली.या घटनेत घरावरील पींलर व पॅरापीड भींत कोसळली असून काही भीतींना तडे गेले आहेत. सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र विजेच्या धक्क्याने साखरे यांच्या घरातील सर्वच विद्यूत उपकरणे,विद्युत वायरिंग पुर्णतः जळाल्याने मोठे नुकसान झाले