अंजनगाव सुर्जी: दहिगाव रेचा-पळसखेड रस्ता पुराच्या पाण्यात गेला वाहून;कडू नाल्यावर पूल बांधकामाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव रेचा ते पळसखेड या ग्रा.मा . न.१९ या पांदन रस्त्यावरील कडू नाल्याला पूर आल्याने रस्ता पूर्णपणे वाहून गेला त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे येणे कठीण झाले आह. तसेच शेतातील संत्रा,केळी,पपई यांसारखा शेतमाल बाजारात नेणे अवघड झाले असून दैनंदिन व्यवहारही ठप्प झाले आहेत.गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात सतत पाऊस चालू असल्याने गरजधरी तलाव पूर्णपणे भरला त्यामुळे कडू नाल्याला पूर आला.अशातच कडू नाल्यातून दहिगाव पळसखेड जाणारा ग्रा.मा.न.१९ हा पांदन रस्ता वाहून गेला