पुणे-सोलापूर लोहमार्गावर रेल्वेच्या अपघातात एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना लोणी काळभोर (Loni Kalbhor) (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडली असून बुधवारी (ता.29) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती.या अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे लोणी काळभोर पोलिसांसमोर आव्हान होते. परंतु लोणी काळभोर पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करून ओळख पटवली आहे.