जालना: इंदिरानगर मध्ये पीआर कार्ड सर्वेक्षणाचा जालना मनपाकडून शुभारंभ; आश्वासनाची पूर्तता-स्थायी सभापती अशोक पांगारकर
Jalna, Jalna | May 4, 2026 जालना शहरातील प्रभाग 14 मधील इंदिरानगर भागातील रहिवाशांना त्यांच्या घरांचे हक्काचे पीआर कार्ड देण्यासाठी जालना शहर महानगर पालिकेच्या वतीने सर्वेक्षणाचा शुभारंभ सोमवारी स्थायी समितीचे सभापती अशोक पांगारकर यांच्या हस्ते करण्यात आला. सोमवार दि. 4 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या योजनेमुळे झोपडपट्टीवासीयांना मोठा फायदा होणार आहे. जालना शहर महानगरपालिका हद्दीतील जवळपास 42 झोपडपट्टी भागात वर्षानुवर्ष घर बांधून राहणारे हजारो रहिवाशांना त्याचा फायदा होणार आहे.