चिखलदरा: पोलीस स्टेशन हद्दीत झोपलेल्या अल्पवयीन मतिमंद मुलीची छेडछाड करुन विनयभंग;ओरडल्यावर आरोपीचे पलायन
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीची छेडछाड करुन विनयभंग केल्याची घटना काल रात्री १०:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.खोडगाव येथील फिर्यादी महिला यांच्या जबानी तक्रारीवरून त्या आपल्या तीन मुलींसह रात्री झोपलेल्या असताना आरोपी शुभम भगवंत कावनपुरे वय २६ वर्ष रा.खोडगाव हा नशेत घरात घुसला आणि फिर्यादीच्या मुलीच्या पायाजवळ तिचे कपडे ओढताना दिसला.फिर्यादी महिलेला जाग येताच महिलेने आरडाओरड केली त्यामुळे आरोपी हा पळून गेला.