चंद्रपूर: जिल्ह्यातील बल्लारपूर येथील अवैध दारू प्रकरणी मिलिंद ट्रेडिंग कंपनी वाईन शॉप पुन्हा २० दिवसांसाठी सील
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार एक्साईज विभागाने जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील मिलिंद ट्रेडिंग कंपनी वाईन शॉपवर आज , १३ नोव्हेंबरला १२ वाजता कारवाई करून दुकान २० दिवसांसाठी सील केले. विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई मागील वेळी आढळलेल्या अवैध दारू साठ्याच्या अनुषंगाने करण्यात आली आहे.