आर्वी पोलिसांना मिळालेल्या माहितीप्रमाणे गणपती वार्ड येथे आज दिनांक 20 ला पाहणी केली असता पुरुष जातीचे प्रेत त्यांना आढळून आले लोखंडी ग्रील काढून पोलीस हवालदार अमर हजारे यांनी दोरीच्या साह्याने ३० ते ३५ फूट खोल विहिरीत जीवाची परवा न करता उतरून पाहणी केली. आणि सदर प्रेताला दोरी बांधून कुजलेले पुरुष जातीचे प्रेत विहिरीच्या बाहेर काढले असून पोलीस हवालदार अमर हजारे हे किरकोळ जखमी झाले.. देविदास नथुजी डहाके राहणार गवानखडी (आर्वी ) यांचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांनी दिली