पालम: पीकविमा कंपनीची बनवेगिरी उघड
सदोष वजनी काटे वापरून केली शेतकऱ्यांची फसवणूक पालम पोलिसांत कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल
Palam, Parbhani | Oct 14, 2025 पिक कापणी प्रयोगाच्या आधारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि पिकविमा मिळू नये यासाठी एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड या विमा कंपनीने सदोष वजनी काटे वापरून ग्रामस्तरीय विमा समितीची फसवणूक केल्याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांच्या फिर्यादीवरून पालम पोलिसांत आज मंगळवार 14 ऑक्टोबर रोजी या विमा कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल.