बार्शीटाकळी: शिर्ल्याच्या मामा-भाच्याने घडवला इतिहास; एकाचवेळी दोघेही झाले क्लासवन अधिकारी!
अकोल्याच्या पातूर तालुक्यातील शिर्ला गावातील मामा-भाच्याची जोडी आज संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे. राजेंद्र घुगे यांनी एससी प्रवर्गातून बारावा, तर त्यांचा भाचा प्रतीक पारवेकर यांनी चौथा क्रमांक मिळवत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चमकदार यश मिळवलं आहे. आर्थिक अडचणी असूनही आई मालती पारवेकर आणि कुटुंबीयांच्या पाठबळावर या दोघांनी चिकाटीने अभ्यास केला. एकाच डब्यात अन्न वाटून खाणारे हे मामा-भाचे आज राज्य शासनाचे अधिकारी बनले आहेत. तर “जिद्द आणि सातत्य ठेवलं तर कोणालाही यश